उस्माननगर। येथील अण्णा भाऊ साठे विचार मित्रमंडळाचे सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी काळबा विठ्ठल भिसे यांचे दि.६ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.ते ६५ वर्षाचे होते.
काळबा भिसे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांचें समाजा विषयी तळमळीने काम करत असे . त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. दि.७ रोजी दुपारी तीन वाजता येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुलं , दोन मुली ,भाऊ,नातू असा परिवार आहे.