उस्माननगर, माणिक भिसे| " आम्ही चालवू आमची शाळा " या उपक्रमाअंतर्गत उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शिक्षक दिनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेचे प्रशासन चालविले.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक "आम्ही चालवू आमची शाळा " या उपक्रमांतर्गत विद्यार्थी विद्यार्थिनींनी एक दिवस शाळा चालवावी असे निर्देश दिले. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी दिग्रसकर तसेच प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे, तुमचं नाव काय यांच्या सूचनेनुसार कंधार तालुक्यात बीईओ संजय येरमे , शिक्षणविस्तार अधिकारी वसंत मेटकर ,केद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी सर्व शाळेत स्वयंशासन दिन घेण्याचे आव्हान केले.
परिषद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जयवंतराव काळे व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वांगेबाई यांनी आम्ही चालवू आमची शाळा अंतर्गत पाचवीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना एकदिवसीय शाळा प्रशासन चालवण्याची जबाबदारी दिली. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून शाश्वत गणेश लोखंडे या विद्यार्थ्यांनी काम पाहिले. तसेच हिंदराज घोरबांड,गौरव काळम , नागेश ॠषिकेश घोरबांड ,पोटजळे , फरहान कुरेशी ,महारुद्र पोटजळे ,निलेश भिसे ,सुरज शिंदे ,बालाजी घोरबांड ,शंकर गायकवाड , मारोती पलडवड यांनी उत्कृष्ट प्रशासनाचे काम पाहिले ,व अनुभव घेतले.सकाळी शाळेत शिक्षक दिनी सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.यावेळी मु.अ.जयवंतराव काळे ,खान , एकनाथ केंद्रे , पाटोदेकर मॅडम , यांची उपस्थिती होती.शाळेत आम्ही चालवू आमची शाळा हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.