भोकर। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने संयुक्त सक्रीय क्षयरोग शोध मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान दि.१३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत राबविण्यात येणार आहे. भोकर शहरात डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर व भोकर तालुक्यात डॉ राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी, आशा , राम रतन नर्सिंग कॉलेज भोकर येथील विद्यार्थीनी यांना प्रशिक्षण देऊन टिम तयार करून यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
भोकर शहरातील शेख फरीद नगर, हनुमान नगर, लक्ष्मी नगर, बटाळा रोड, किनवट रोड या भागात घरोघरी भेट देऊन क्षयरोगाची लक्षणे सांगून व कुष्ठरोगासाठी तपासणी करून मोहिम व अभियान राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत पुढील पैकी कोणतेही एक लक्षणे असल्यास संशयित " क्षयरुग्ण " समजावा १) दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला २) दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप ३) वजनात लक्षणीय घट ४) भूक मंदावणे ५) मानेवर गाठी येणे इतर व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगासाठी पुढील तीन गोष्टी तपासून घ्या १) तेलकट, गुळगुळीत, सुजलेली व लालसर त्वचा. कालांतराने जाड झालेल्या कानाच्या पाळया,विरळ झालेले भुवयांचे केस २) शरीरावरील त्वचेपेक्षा फिक्कट किंवा लालसर रंगाचा, त्रास न देणारा, बऱ्याच दिवसांचा कुठलाही डाग/ चट्टा ३) हाता- पायांना सुन्नपणा/ बधिरता, स्पर्शज्ञान नसणे, स्नायुंचा अशक्तपणा व डोळा, चेहरा, हात किंवा पायांची विकृती मोहिमे दरम्यान घरोघरी भेट देऊन आरोग्य कर्मचारी, प्रशिक्षित स्वयंसेवकांडून तपासणी करून घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन भोकर आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
सदरील मोहीम मध्ये सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, क्षयरोग तालुका पर्यवेक्षक संतोष तळपते, कुष्ठरोग पर्यवेक्षक संघसेन गजभारे हे पर्यवेक्षक करीत आहेत. पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी हे टिमचे नियोजन करून काम करीत आहेत. संशयित क्षयरुग्ण यांची तपासणी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे क्ष-किरण तपासणी कु.रोहिणी भटकर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, थुंकी नमुना (बेडका) तपासणी बालाजी चांडोळकर, अत्रिनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी झाहेद अलि प्रयोगशाळा सहाय्यक, ट्रूनेट तपासणी जागृती जोगदंड यांच्या कडून करण्यात येत आहे.
राम रतन नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नितीन जाधव सर यांनी सर्वेक्षण करण्याकरीता विद्यार्थीनी उपलब्ध करून दिले. ऋतुजा टारपे, प्रिती खुपसे, पुजा झाडे, अश्विनी खुपसे, सोनम बोरकर, गुंजन जाधव, प्रिया खंदारे, सलमा पिंजारी, अनुसया गायकवाड, सरस्वती वाघमारे, आरती टिकेकर, योगीता जंकर, कोमल गवारकर, राजेश्वरी टिकेकर, ऐश्वर्या जगलीकर, दिपा लोखंडे, शालिनी आगडेवाड, शितल गोरेकर, पुजा कावळे, अस्मिता जोंधळे, वैष्णवी राठोड, शिवानी चिंचलकर, संजिवनी कमठेवाड, नेहा खंदारे, वैशाली कोरटवाड, वैष्णवी जेलेवाड, योगिता कराळे, वैष्णवी भालेराव, अरूणा मचकंटे व मेघा अंकुरवाड या विद्यार्थ्यांनी मोहिमे मध्ये सर्वेक्षण करत आहेत.