हिमायतनगर। आज दिनांक 14/09/2022 बुधवार रोजी थोडंसं माय बापासाठी पण या नावीन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत दर बुधवारी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण विभागांत ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येते व त्याची google sheet मध्ये नोंदणी करण्यात येते.
सन 2021-2022 पासुन संपुर्ण नांदेड जिल्ह्यात मा. सुनील केंद्रेकर साहेब, विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचे संकल्पनेतून व मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, सौ. वर्षा घुगे (ठाकुर) मॅडम , आरोग्य विभाग प्रमुख मा.डॉ.बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी सुचित केल्याप्रमाने दर बुधवारी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण विभागांत ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येते व त्याची google sheet मध्ये नोंदणी करण्यात येते.
तसेच आज प्राथमिक आरोग्य केंद्र, सरसम येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव नखाते व डॉ.अभिमन्यू केंद्रे वैद्यकीय अधिकारी आणि सदर कार्यक्रमाचे नोडल ऑफीसर डॉ.सत्यनारायण मुरमुरे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . संदेश पोहरे, आरोग्य पर्यवेक्षक श्री नागमवाड, आशा समन्वयक श्री कृष्णा चौधरी, कार्यक्रम समन्वयक श्री सचिन देशमुख व सर्व आरोग्य कर्मचारी हजर होते.सदर तपासणी मध्ये खालील आजाराची तपासणी उदा. मधुमेह , कर्नदोष, सांधीवात, दमा, कर्करोग, रक्तदाब, मोतीबिंदू शस्त्रक्रिया बाबत मार्गदर्शन, मानसिक रोग आजार, आणि ईतर आजाराची ग्रामीण भागातील 75 रुग्णावर आज तपासणी करण्यात येऊन किरकोळ औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले.