वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त जि.प. शाळेला २०० पुस्तकांची भेट -NNL


नांदेड| '
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती' या उक्तीप्रमाणे कै.सी बी वाघमारे यांचा आचार, विचार आणि कृतीचा समृद्ध वारसा सामाजिक जाणिवेतून तेवत ठेवणारे सुपुत्र जयप्रकाश वाघमारे व स्नुषा उषा जयप्रकाश वाघमारे (गुंटुरकर ) यांनी कै.सी.बी वाघमारे यांच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त जि.प.प्रा.शा.दगडगाव शाळेला  २०० पुस्तकांची अनोखी भेट देऊन आपल्या वडीलांचा खऱ्या अर्थाने स्मृतीदिन साजरा केला. गेल्या बावीस वर्षापासुन अखंडीतपणे असा हा सामाजिक जागृतीचा  पायंडा घालुन समाजप्रबोधन करीत आहेत.

स्मृतिदिनाचा  कुठलाही अवाढव्य खर्च टाळून जि.प.प्रा.शा.दगडगाव येथे शा.व्य.स.अध्यक्ष, उपाध्यक्ष, केंद्रप्रमुख नागोराव जाधव, शाळेचे मु.अ.व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कै. सी बी. वाघमारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वरील पुस्तकाचे व खाऊचे वाटप करण्यात आले आणि आगळा वेगळा  सामाजिक भावनेचा  व जागृकतेचा संदेश दिला, अभिमानास्पद कार्य केले. दानशुर व्यक्तीमत्व असलेल्या वाघमारे दांपत्याचा प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापकांनी सत्कार करुन आभार मानले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी