खा.चिखलीकर यांनी उस्माननगर येथे भिसे व शिराढोण येथील शहीद जवान भुरे कुंटूबांचे सात्वन -NNL


उस्माननगर।
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उस्माननगर येथील सेवानिवृत्त कॅशियर  कै.काळबा भिसे आणि शिराढोण येथील शहीद जवान राजेश्वर भुरे यांच्या परिवाराचे सात्वन केले.

 उस्माननगर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त कॅशियर तथा सामाजिक कार्यकर्ते कै.काळबा विठ्ठल भिसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तर शिराढोण येथील भूमिपुत्र  राजेश्वर भुरे हे  इएमई बटालियन मध्ये सिकंदराबाद ( हैदराबाद) येथे   कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आले होते.नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर हे दोन्ही परिवाराचे सात्वन करून धीर दिला.


यावेळी गणेशराव सावळे ( मा.जि.प.सदस्य) यांच्यासह उस्माननगर येथील माधवराव भिसे
, सुरेश बास्टे , शिवशंकर काळे,रुद्र वारकड , बालाजी वर्ताळे आलेगावकर, आमिन आदमनकर (मा.सरपंच) बालाजी पु.घोरबांड,  शिराढोण येथील कार्यकर्ते साईनाथ पा.कपाळे, विश्वनाथ पांडागळे, मुक्काम पांडागळे, आनंदराव देवणे , सदाशिव बड्डू, बस्वलिंग भुरे ,मुसाभाई इब्राहिम ( मा सरपंच ,) यांच्या सह दोन्ही  गावातील  मयताच्या कुटुंबातील परिवार व  कार्यकर्ते  उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी