हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात 20 ते 25 विद्यार्थ्यांना उपचारासाठी आणले
हिमायतनगर,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या मौजे जलदरा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नित्याप्रमाणे 10 वाजता जेवण देण्यात आले होते. सर्वाना देण्यात आलेल्या जेवणाच्या मेनुमध्ये भात, वरण, चपाती आणि वांग्याच्या भाजी देण्यात आली. जेवणं झाल्यानंतर काही तासन विद्यार्थ्यांना मळमळ उलटी तर काहींच्या गळ्यात व पोटात दुखू लागले, हा प्रकार एक एक करत 20 ते 25 मुली आणि काही मुलांना जाणवू लागला. त्यामुळे तात्काळ त्या विद्यार्थ्याना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी 5 विद्यार्थ्यांना नांदेडला रेफर करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ डी डी गायकवाड यांनी दिली.
हिमायतनगर शहरापासून 25 किमी अंतरावर जलधारा गाव आहे, येथील निवासी आश्रम शाळेत 1 ते 12 वी पर्यंत तब्बल 400 विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना राहण्यासाठी व जेवणाची सोय आदिवासी प्रकल्प विभागाने केलेली आहे. नित्याप्रमाणे आज दि 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जेवण देण्यात आले होते. सर्वाना देण्यात आलेल्या जेवणाच्या मेनुमध्ये भात, वरण, चपाती आणि वांग्याच्या भाजी देण्यात आली. जेवणं झाल्यानंतर काही तासन विद्यार्थ्यांना मळमळ उलटी तर काहींच्या गळ्यात व पोटात दुखू लागले, हा प्रकार एक एक करत 20 ते 25 मुली आणि काही मुलांना जाणवू लागला. त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयलयात दाखल करण्यात आले.
उपचार करण्यासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकारी डॉ माधव भुरके व वैद्यकीय टीमने उपचार सुरू केले. पैकी काजल शंकर तांबारे वय 17 वर्ष, सरिता विठ्ठल पिंपळे वय 15 वर्ष, पूजा बालाजी ढोले वय 15 वर्ष ,जयश्री परमेश्वर डूडुळे वय 16 वर्ष, दिव्या विलास ढोले वय 15 वर्ष, चांदणी भाऊराव मेंडके वय 14 वर्ष ,वैष्णवी ज्ञानेश्वर मिराशे वय 12 वर्ष, वंदना मारोती डुकरे वय 14 वर्ष , संध्या देविदास शेळके वय 26 वर्ष, ओमसाई शंकर ढाले वय 18 वर्ष , दिव्या रामदास मेंडके वय9 9 वर्ष ह्या 11 विद्यार्थ्यांना आश्रम शाळेतील शिक्षकांनी हिमायतनगर येथे आणले होते. त्यां सर्व विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे प्रथम दर्श अंदाज डॉक्टरांनी वर्तवीला आहे. हा प्रकार लक्षात येताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनेची माहिती व प्रकृतीची विचारण्या करसाठी रुग्णालयात गर्दी केली होती.
शालेय जेवण बनवीणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा गंभीर प्रकार घडला. या सर्व विद्यार्थ्यांनी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यापैकी 5 जणांना नांदेडला उपचारासाठी रेफर केल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी डी गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.माधव भुरके यांनी सांगितले, ईतर विद्यार्थ्यांना उपचार दिला जात असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे त्या सर्वाना येथे उपचार केले आहेत. वृत्त लिहिपर्यंत आणखी 2 ते 3 विद्यार्थ्यांना येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. अन्य विद्यार्थ्यांना तपासणी करण्यात साठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाची एक टीम सबंधित आश्रम शाळेच्या ठिकाणी पाठवण्यात आली असुन, विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले. येथील कर्मचाऱ्यांचा निष्काळजी पण विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा ठरला असून, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक सांघटनांनी केली आहे.