नांदेड। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमानुसार नांदेडचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर, वैद्यकिय आघाडी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ अजित गोपछडे, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा सरचिटणीस डॉ माधव पाटील उच्चेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव नांदेड येथे वैद्यकिय आघाडी नांदेड ग्रामीणच्या सहकार्याने डॉ लक्ष्मण इंगोले, डॉ बाबासाहेब बंडेवार आणि डॉ जीवन जोशी यांनी भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते .या शिबिराचा असंख्य रूग्णांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन प्रदेश भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. प्रणिताताई देवरे पाटील-चिखलीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैद्यकीय आघाडीचे भाजपा महानगराध्यक्ष नांदेडचे डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर होते. ह्या कार्यक्रमासाठी डॉ अजित गोपछडे यांच्या सह जिल्हा सरचिटणीस डॉ माधव पाटील उच्चेकर, युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख, वैद्यकिय आघाडी भाजपा नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ प्रसाद डोंगरगांवकर हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड भाजपाचे जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मणराव इंगोले,वैद्यकिय आघाडी भाजपा चे मराठवाडा सहसंयोजक डॉ. बाळासाहेब बंडेवार, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सह संयोजक डॉ.जीवन जोशी, अर्धापूर भाजपा तालुकाध्यक्ष बालाजीराव स्वामी,वर्षाताई बंडाळे यांनी परिश्रम घेतले तर वैद्यकिय आघाडी भाजपा नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि बालरोग तज्ञ डॉ. प्रसाद डोंगरगावकर, वैद्यकिय आघाडी भाजपाचे नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष आणि अस्थीरोगतज्ञ डॉ सचिन पाटील उमरेकर, डॉ. इंदूरकर, डॉ. राहुल देशमुख, डॉ. एकलारे मॅडम आदी डॉक्टरांनी शिबिरात तपासणी केली.
ह्या शिबिरामध्ये लायन्स क्लब नांदेडच्या वतीने मोफत डोळे तपासणी तसेच मोती बिंदू शस्त्रक्रिया लाभार्थी नोंदणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी कृष्णा पाटील, जठन मुळे, विलासराव साबळे, विलासराव इंगोले राजाभाऊ, बालाजीराव मोरकुंदे, पत्रकार रामराव भालेराव, सचिन कल्याणकर, यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी यांचेही योगदान लाभले.
केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक जनकल्याणकारी योजना थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या याबद्दल लोकप्रिय पंतप्रधान मोदीजींना वाढदिवसाच्या निमित्ताने लाभार्थ्यांनी पत्र लिहून टपालाद्वारे शुभेच्छा पाठविल्या. ह्या कार्यक्रमात सौ प्रणिताताई देवरे पाटील चिखलीकर यांच्यासह डॉ अजित गोपछडे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. डॉ बाबासाहेब बंडेवार यांनी मोदींजींच्या जीवनावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय समारोप डॉ सचिन उमरेकर यांनी केला तर सूत्र संचालन डॉ जिवन जोशी यांनी केले तर समारोप श्री चानाप्पा डिग्रसे यांनी केला. प्रदेश संयोजक डॉ अजित गोपछडे यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली वैद्यकिय आघाडी भाजपा महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात पंतप्रधान आदरणिय नरेंद्रभाई मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यात, अनेक सेवा कार्यक्रम, रक्तदान शिबिर आणि रोग निदान शिबिरांचे आयोजन करीत आहे.