बेकायदेशीर व नियमबाह्य कार्यवाहि करण्याकरिता राजकीय दबावाचा परिचारिका संघटनेचे निषेध-NNL


नांदेड।
ज्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही, त्याची बदनामी केली जाते ह्याचे जिवंत उदाहरणं म्हणजे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्षा डॉ मनीषा शिंदे मॅडम यांच्याविरुद्ध झालेल्या खोट्या तक्रारी व चौकशी समिती मार्फत क्लीन चिट भेटल्यानंतर सुद्धा बेकायदेशीर व नियमबाह्य कार्यवाहि करण्याकरिता राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

त्या निषेधार्थ व श्री छ.शि.म.सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील मा. अधिसेविका यांच्याकडून अधिकाराचा गैरवापर करुन, परिचारीका संवर्गात होत असलेल्या त्रासाबाबत कार्यवाहीच्या मागणीस्तव पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा :-नांदेड ( विष्णुपुरी ), आज दिनांक 07/09/2022 पासून आपल्या सर्व सभासदासह काळ्या फिती लावून दोन तास निदर्शने करत सहभागी झाली.

त्यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी  वर्ग श्रीमती. सुनीता शिंदे मॅडम, श्री. केशव  जिंकलवाड  सर , श्री. रवि शिसोदे  सर , श्रीमती. वाघदरीकर मॅडम , व सर्व परिचारिका वर्ग मोठ्या उत्साहाणे पूर्ण शक्ती निशी      संपात  सहभागी झाले... त्या वेळी डॉ. मनीषा मॅडम  यांच्या समर्थनार्थ  घोषणा देण्यात आल्या व मनमानी कारभार  करणाऱ्या प्रशासना विरुद्ध निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

// मेरा वक्त मुझे हराते हराते गुजर गया जमाने ने समझा कि मै हालातो सें डर गया, मेरे हालात ने देखी जब मेरे हौसले  कि ताकत  तो बेचारा हालात खुद ही सुधर गया  // महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा :- नांदेड ( विष्णुपुरी )

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी