नांदेड| मनोहर एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव कै. मनोहरराव गायकवाड यांच्या जयंती निमित्त दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता धनेगाव राठौर कार्नर कैनौल रोड येथील निवासी अंध कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे फळे वाटप करण्यात आली.
सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमाला श्रीमती आनिता गायकवाड, मुख्याध्यापक दिपक कदम, दिगंबर शिंदे, प्रफुल्ल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजुसिंग चौव्हाण उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व कै. मनोहरराव गायकवाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम आयोजित करण्याकरिता प्रफुल्ल गायकवाड, राजु चव्हाण समवेत विहार लष्करे, गणेश उच्चेकर, वैभव लष्करे, सिध्दोधन कापसीकर व निवासी केंद्राचे दत्ता घोगरे, आनंदा घोगरे, शिवानंद माने, गोदावरी वाघमारे यावेळी उपस्थित होते.