कंधारमध्ये रामचंद्र येईलवाड यांनी केली आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात
कंधार, सचिन मोरे| गौरीचे आगमन ही महाराष्ट्रातील जुनी परंपरा आहे. घरोघरी गौरीची स्थापना करून तिची पूजा केली जाते. यापुरातन रूढी परंपरेला छेद देत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांनी गौरीपूजना निमित्त आपल्या सुनांची पूजा व सन्मान करून परिवर्तनाचा संदेश दिला .या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने त्यांनी शहरासह तालुक्यात लोहा कंधार विधानसभा मतदार संघात आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.
शनिवार दिनांक ०३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर गौरीचे आगमन झाले. वेगवेगळ्या मुखवट्यानी प्रत्येक घरातहर्ष उल्हासात गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली. गौरीचे अनेक रूपे लक्ष्मी आगमना तून समोर आले परंतु कंधार शहरात रामचंद्र येईलवाड यांनी आपल्या दोन सुनांना लक्ष्मी मानत एक आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा सन्मान केला आहे. गौरीपूजना निमित्त लक्ष्मीचे वाजत गाजत मोठ्या सन्मानाने घराघरात आगमन केले जाते. परंतु कल्पनेच्या भावविश्वाततून बाहेर पडत जी सातत्याने घरातील सर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत असते.
बचत करत असते हीच खरी चालतीबोलती लक्ष्मी आहे असे समजून येईलवाड यांनी स्वतःच्या सुना वर्षा सुदर्शन येईलवाड व प्रतिभा शशिकांत येईलवाड या दोन सुना म्हणजे लक्ष्मीचे खरे रूप त्यांची पूजा गौरीपूजनाच्या दिवशी केली. खऱ्या अर्थाने पूर्वीपासूनच मुलीला सुनेला लक्ष्मीचे रूप मानले जाते परंतु वास्तवात वेगळीच वर्तणूक दिली जाते. त्यामुळे मुलगी असो वा सून तिला आपली लक्ष्मी मानले पाहिजे असा या या कार्यक्रमातून संदेश देण्यात आला. या कार्यक्रमालासुखदेवराव येईलवाड, पदमीनबाई येईलवाड, कमलबाई येईलवाड, राष्ट्रवादीचे दत्ता कारामुंगे,मू.अ.गंगाधर येईलवाड, शिवकांता येईलवाड, नामदेव कदम, माधव नलाबले, सुदर्शन येईलवाड, शशिकांत येईलवाड, डॉ. भास्कर येईलवाड, साहेबराव शिंदे, राघोजि गोरे, प्रदीप लोखंडे, विनायक येईलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि.प. सदस्य रामचंद्र येईलवाड यांनी केले तर आभार शशिकांत येईलवाड यांनी मानले.
हजारो वर्षापासून आम्ही गौराईची प्रतिष्ठापना करतो. लाकडाची,पत्राची आणि धान्य यावरील चिखलाचा मुखवटा ही खरी लक्ष्मी नव्हेतर खोट्या लक्ष्मीच्या नादाला लावून आम्हाला बरबाद करण्यात आले ही चुकीची प्रथा तात्काळ मोडून काढूत समाजाने आपल्या कुटुंबातील चालती-बोलती आपली सून, लेक आई, बहीण ही आपल्या घरची खरी लक्ष्मी आहे या लक्ष्मीचा मान सन्मान केला पाहिजे. महिलांचा जिथे मान सन्मान होतो तिथे लक्ष्मीसुख-समृद्धीने नांदते म्हणून ही जुनाट प्रथा बदलली पाहिजे असे आव्हान राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांनी केले