लोहा| गउळ सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत माजी सरपंच संजीव कुमार तेलंग व माजी जि प सदस्य बाबुराव गिरे या दोन नेत्यांच्या श्री संत योगीराज निवृत्ती महाराज शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. या सोसायटीत चिखलीकर गटाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले असे संजीव कुमार तेलंग यांनी सांगितले.
गऊळ सेवा सहकारी सोसायटी मध्ये माजी उपसरपंच संजीवकुमार तेलंग व माजी जि प सदस्य बाबुराव गीरे यांचे संयुक्तिक पॅनल होते. एकूण ४०१ मतदार होते पैकी ३६६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला यात तेलंग-गीरे गटाने सर्वच जागा म्हणजे १३ पैकी १३ जागा जिंकल्या. विजयी उमेदवार - कागणे चुडाजी व्यंकोबा (मते१८५, ) गायकवाड गणपत संभाजी (१९१ मते) , गिरे भगवान दशरथ (१९३मते) ,तेलंग किशन देवराव (१८६ मते) , तेलंग बाबाराव मारोती (१९६ मते) , तेलंग बालाजी मारोती (१९९ मते) , पंदेवाड गंगाधर मारोती (२०० मते) ,मुंडे माधव नामदेव ( १९४ मते) महिला राखीव गट -गिरे अनुसायाबई बालाजी ( २०८ मते) ,तेलंग सत्यभामा संजीवकुमार (२१० मते)इतर मागासवर्गीय-पांचाळ ज्ञानोबा सीताराम ( २०५ मते) अनु. जाती/जमाती- देवकांबळे खंडू ग्यानोबा (२०८ मते) विमुक्त भटक्या जाती/जमाती- जायेभाये भागीरथाबाई पांडुरंग (२०५मते) हे उमेदवार विजयी झाले.
यासाठी माजी सरपंच उद्धव तेलंग , प्रदीप केंद्रे , तातेराव जायेभाये, सरपंच सतीश देवकत्ते, सुधाकर केंद्रे, सुभाष पाटील तेलंग, उत्तमराव तेलंग, माधव तेलंग, संजय देवकांबळे, बाबू पवार, गंपू राठोड, गंगाधर केंद्रे, शरद पाटील तेलंग, सुभाष गिरे, परमेश्वर केंद्रे, शिवाजी जायेभाये, भगवान पंदेवाड , राजेश गिरे, राजेश तेलंग, भास्कर तेलंग, श्रीनिवास तेलंग यांचे या विजयात योगदान मिळाले.