वाढोण्यातील भाविकांना येथेच दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेता येणार
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यातील भाविक भक्तांना दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणे सुलभ होणार यावर विश्वास बसत नाही ना...परंत्तू हि गोष्ठ खरीच आहे. शहरातील पोलिस स्थानकासमोरील दक्षिणमुखी मारोती मंदिरात बजरंग दलाच्या युवकांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीचे हुबेहूब प्रतिकृती असलेली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याची माहिती गणेश मंडळाचे कार्यकर्ते गजानन चायल यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली.
दोन वर्षातील कोरोनाच्या कालखंडानंतर पुन्हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. बजरंग दलाच्या युवकांकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणपती उत्सवादरम्यान रक्तदान शिबीर, अन्नधान्य वाटप, भव्य अन्नदान, महाप्रसाद यासह विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येतात. यावर्षी देखील मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, येउन विसर्जनाच्या दिवशी भव्य महाप्रसादाचे वितरण केले जाते.
यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिरासह अनेक उपक्रम राबविले जाणार असून, विशेष म्हणजे, भव्यदिव्य देखाव्यासाठी हिमायतनगर येथील बजरंग गणेश मंडळाने यंदा थेट पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीची हुबेहूब प्रतिकृती स्थापन केली आहे.हिमायतनगर वाढोण्यातील भाविकांना शहरातच दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेता येणार आहे. यासाठी शहरातील सर्वच गणेश मंडळाच्या युवकांचे, पोलीस प्रशासनासह व्यापारी मंडळाचे योगदान लाभते असेही गजानन चायल यांनी सांगितले आहे.