हैदराबाद मुक्ती लढ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठातर्फे छायाचित्र स्पर्धेचे आयोजन -NNL

प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे २१, १५, ११ हजार रुपये पारितोषिके 


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दरवर्षी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांच्या संकल्पनेतून छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचे हे चौथे वर्षे आहे. तसेच हैदराबाद मुक्ती लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त हैदराबाद मुक्ती लढ्याचे हे अमृत वर्ष आहे. प.पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने असणाऱ्या या विद्यापीठाच्या वतीने हैदराबाद मुक्ती लढ्याच्या स्मृती वेळोवेळी जागवल्या आहेत. 

छायाचित्र स्पर्धेच्या निमित्ताने हैदराबाद मुक्ती लढ्याच्या स्मृती ‘सांस्कृतिक ऐतिहासिक मराठवाडा’, ‘हैदराबाद मुक्ती लढ्याशी संबंधित मराठवाड्यातील स्थळांची छायाचित्रे, मराठवाड्यातील ऐतिहासिक वास्तूंचे छायाचित्रे आणि विद्यापीठ परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांचे ‘सांस्कृतिक वैभव’ या चार विषयावर हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांकडून १२ सप्टेंबर पर्यंत छायाचित्र मागविण्यात येत आहेत. 

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून यामध्ये हौशी व व्यावसायिक छायाचित्रकार सहभाग घेऊ शकतात. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या परीक्षण समितीचा निर्णय हा अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक असेल, विजेत्यांना प्रथम पारितोषिक रु. २१,०००/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल, द्वितीय पारितोषिक रु. १५,०००/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रु. ११,०००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल, याशिवाय उत्तेजनार्थ तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये रोख पारितोषिक रु. ५,०००/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

इच्छुक स्पर्धकांनी १२ इंच बाय १८ इंच आकाराची छायाचित्राची एक प्रत एकाच लीफाप्यामध्ये टाकून दि. १२ सप्टेंबर पर्यंत जनसंपर्क कार्यालयात जमा कराव्यात. सदरील छायाचित्राचे सॉफ्ट कॉपी drprithvirajtaur@gmail.com  आणि srtmunpro1@gmail.com या मेलवर पाठविणे आवश्यक आहे. प्रत्येक छायाचित्राच्या पाठीमागे व लिफाफ्यावर स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी लिहिणे आवश्यक आहे. 

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी ‘संस्कृतिक/ऐतिहासिक मराठवाडा’ या सूत्राखाली हैदराबाद मुक्ती लढ्याशी संबंधित मराठवाड्यातील स्थळाची छायाचित्रे, मराठवाड्यातील ऐतिहासिक वास्तूंची छायाचित्रे आणि विद्यापीठ परिक्षेत्रातील जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव या संदर्भाने आणि एकूणच मराठवाड्याचा इतिहास यांचे सचित्र दर्शन छायाचित्रातून घडावे अशी अपेक्षा आहे. 

या सर्व छायाचित्राचे प्रदर्शन दि. १६ सप्टेंबर रोजी विद्यापीठ परिसरातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलामध्ये अथवा इतर ठिकाणी भरवण्यात येईल. मान्यवर परीक्षकांना निमंत्रित करून छायाचित्राचे परीक्षण करण्यात येईल. त्यानंतर विजेत्यांना विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येतील. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९५७९१३६४६६, ९४२३६९२९३९ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ.पृथ्वीराज तौर आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी