उस्माननगर, माणिक भिसे। येथूनच जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथे भीमाशंकर स्वॅमिलचे संचालक मारोतराव पांचाळ यांनी सेवानिवृत्त कृषीधिकारी अधिकारी व नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला होते.
.यावेळी कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून कंधार तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बालाजीराव पाटील पांडागळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गणपतराव देवणे, सत्कार मूर्ती सेवानिवृत्त कृषीधिकारी संभाजी कराळे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिवआप्पा देवणे,वनरक्षक पंढरे, माजी उपसरपंच मुक्ताराम पांडागळे, काशीकर, शिवहार पांडागळे, पत्रकार शुभम डांगे, दौलत पांडागळे, सुनील भुरे, नागेश नांदेड आदी उपस्थित होते यावेळी कार्यकर्माचे सत्कार मूर्ती तथा सेवानिवृत्त कृषीधिकारी संभाजी कराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले, कि माझ्या आयुष्यात मला यशाची सुरवात व शिदोरी ही दिवंगत नेते माधवरावजी पांडागळे साहेबांनी दिली त्यांच्या सहकार्यनेच मी आयुष्यात पुढे गेलो मला माझ्या प्रसासकीय सेवेत काम कसे करायचे हे शिकवण अगदी माधवराजी पांडागळे साहेबांनी दिली म्हणूनच मी आयुष्यात मला शोभेल असे शिखर पार केले. कै. माधवराव पांडागळे हे सदैव माझ्या स्मरणात राहतील असेही ते म्हणाले. सूत्रसंचलन मनोज जमदाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश पांचाळ यांनी मानले.