नविन नांदेड। रशिया येथेअण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्या नंतर सिडको येथील अण्णाभाऊ साठे स्मारक येथे फटाक्यांच्यी आतीषबाजी करत जल्लोष करुन अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जयंती मंडळ ,समाज बांधव व पदाधिकारी यांनी अभिवादन केले.
रशिया येथे लोकशाहीर, साहित्य सम्राट,अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा अनावरण करण्यात आल्या नंतर सिडको येथे १५ सप्टेंबर रोजी समाज बांधव व पदाधिकारी यांनी जल्लोष व्यक्त केला यावेळी दलीत मित्र नारायण कोंलबीकर, छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपीले, पेटंर खानझोडे,पप्पु गायकवाड, निवृत्ती कांबळे प्रा, गादेकर नवनाथ बारूळकर,अवधुत आंबटवार, निळकंठे, केशव कांबळे,आंनदा वाघमारे,डिगा पाटील, संजयकुमार गायकवाड, छायाचित्रकार सांरग नेरलकर,यांच्या सह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते