नविन नांदेड। निट २०२२ परिक्षेत गौरव मारोती शिंदे यांनी ७२० पैकी ६८५ गुण घेऊन नांदेड जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविल्या बद्दल जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
मुळ धनेगाव येथील व सध्या सिडको परिसरातील जिजामाता वसाहात परिसरातील मारोती शिंदे यांच्या मुलगा गौरव शिंदे यांनी हे धवधवीत यश संपादन केले असून दैनंदिन अभ्यासक्रम सह खाजगी शिकवणी आय,आय,बी, व भार्गव येथे घेऊन हे यश संपादन केले आहे, फिजिक्स मध्ये १८० पैकी १८० गुण गौरव यांच्या मोठा भाऊ हा सॉफ्ट वेअर इंजिनिअर बेंगलोर येथे सर्व्हिस ला असुन लहानपणापासून अभ्यासा मध्ये यश प्राप्त होत गेले,गौरव यांच्या शिक्षणात आई विध्या शिंदे व ऑक्सफर्ड इंटरनेशनल शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा मॅडम,व भार्गव राजे,आय आय,बी दशरथ पाटील यांच्या मोलाचा सहकार्य मुळे हे यश संपादन केले आहे.
गौरव शिंदे यांच्या यशाबद्दल वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे ,साहेबराव जाधव,नांदेड दक्षिण विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष गंगाधर कवाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी राजेश बोटलवार,संग्राम निलपत्रेवार, ग्रामपंचायत सदस्य तातेराव ढवळे, संग्राम निलपत्रेवार,नजीर शेख, श्रीनिवास माडेवार, देशमुख माधवराव,यांनी व धनेगाव ग्रामपंचायत संरपच पिंटू पाटील शिंदे,दिंगाबर शिंदे धनेगावकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.