हिंदु जनजागृती समितीचा विशेष संवाद
मुंबई| 75 वर्षांपूर्वी ज्यांच्या कार्यकाळात आपल्या देशाचे विभाजन झाले, तो काँग्रेस पक्ष ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणार्या कन्हैयाकुमारला सोबत घेऊन ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे. पाद्री जॉर्ज पोनैय्या जो भारतमातेला ‘अपवित्र’ मानतो आणि फक्त येशूला मानतो, तसेच हिंदूंच्या देवी-देवतांना न मानता त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करतो. राहुल गांधी जॉर्ज पोनैय्यासारख्या पाद्र्यांना घेऊन यात्रा काढतात, त्यावेळी त्यांच्या उद्देशावरच प्रश्न निर्माण होतो.
अशा भारतमातेचा अवमान करणार्यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे, असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली राज्य प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थित केला. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘भारत तोडो’मध्ये सहभागी जॉर्ज पोनैय्यासारखे ईसाई पाद्री !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ संवादात बोलत होते.
‘भारत व्हाईस’च्या संस्थापिका गायत्री एन्. म्हणाल्या की, पाद्री जॉर्ज पोनैय्या याने नुकतेच भारतमातेचा अवमान करणारे वक्तव्य केले. त्यांनी एक वर्षापूर्वीही भारतमातेला शिव्या देऊन वादग्रस्त वक्तव्ये केली होती. ज्या धरतीला आपण मातेसमान मानतो, त्याविषयी घृणास्पद वक्तव्य करण्यार्या या पाद्रीची मानसिकता यातून लक्षात येते. ‘जीझस’ला सर्वांनी मान्य करावे, हे थोपवण्यासाठी ख्रिस्ती सतत प्रयत्नरत आहेत. पूर्वी हे ‘इन्क्विझिशन’ करायचे, आता वेगळ्या पद्धतीने जीझस आणि त्यांचा पंथ आपल्यावर लादत आहेत. आज दक्षिण भारतात तर शाळांमध्ये सुद्धा हिंदू विद्यार्थ्यांवर उघडपणे ख्रिस्ती धर्माची सक्ती केली जात आहे, हे सर्व थांबायला हवे.
श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.(संपर्क : 99879 66666)