हदगाव, शे चांदपाशा। हदगाव शहरातील उमरखेड टी पाईटवर सार्वजनिक वितरण व्यवथेचा चोरट्या मार्गानं काळ्या बाजारात ट्रकद्वरे जाणारा ३०टन वजनी ५ लक्ष ८५००० रुपायाचा असलेला व १०.०००.०० लाख रु ट्रक पोलिसानी ताब्यात घेतला आहे. हदगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे हदगाव पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते.
या बाबतीत मिळालेली माहीती अशी की दि १८ सप्टेंबर २०२२ रोजी एका माहीतीच्या अधारे पोलिसानी या बाबतीत ट्रक क्र Gj-25U-7858 या ट्रकची झडती घेतली असता या ट्रकमध्ये अंदाजे ३०टन वजनी तादुळाचे ६०० पोते काळ्या बाजारात विक्री करिता नेत असल्याचे चौकशीअंती दिसुन आले. या प्रक्रणी हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक जगन्नाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई झाली.
पोलिस उपनिरक्षक संजय गायकवाड बाबतीत फिर्यादी दिली असुन, हदगाव पोलिस स्टेशन मध्ये गु.र.न.२८७/२०२२ कलम ३.७.अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ वरुन दाखल केली यांनी या बाबतीत करित आहे. नव्यानेच रुजु झालेले पोलिस निरक्षक जगन्नाथ पवार हे या प्रक्रणाचा तपास करित आहे विशेष म्हणजे नव्यानेच रुजु झालेले नुतन पोलिस निरक्षक जगन्नाथ पवार यांच्या या धाडसी कारवाई मुळे रेशनचा माल ब्लाँक करणा-या मध्ये भिती निर्माण झाली आहे. या कारावाई मुळे नागरिकांत हदगाव पोलिसाच कौतुक होत आहे.