हदगाव। शहरातील मानाच्या असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी शशिकांत शिवराज माळोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
हदगाव शहरतील जुन्या गावातील माळोदे गल्ली येथे १९२५ रोजी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली.गावातील मानाच्या गणपतीचे ९८ वे वर्ष चालू आहे. गणपती उत्सव काळात गावातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी शहरासह तालुक्यातील खेेेेड्या- पाड्यातील हजारो भक्त याठिकाणी येत असतात.
यावर्षी मानाच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी शशिकांत शिवराज माळोदे यांची तर उपाध्यक्षपदी अभिजित राजेश्वर तालंगकर,कोषाध्यक्षपदी सूर्यकांत आशोकराव माळोदे, सचिवपदी भाऊसाहेब संभाजी तालंगकर, सहसचिव बबलू विठ्ठलराव माळोदे यांची तर सदस्य गोपाल माळोदे,पवन माळोदे,आशिर्वाद माळोदे,अक्षय माळोदे,श्याम तालंगकर,केदार माळोदे, सौरभ नरवाडे,श्रीकांत माळोदे,अभिषेक माळोदे, ईश्वर माळोदे,अक्षय पांडे,विशाल वानखेडे,मयूर माळोदे,पवन गटूले,यश टीकोरे,योगेश कदम,ऋतिक तालंगकर,सौरभ पांडे,शैलेश पांडे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.