लंम्पि आजाराशी गाई- म्हशीच्या दुधाचा काहीएक संबंध नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नये - डॉ.सोनटक्के -NNL


हिमायतनगर|
सध्या जिल्हाभरात लंम्पि आजाराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या आवाहनानंतर अफवांना पेव फुटले असून, गाई- म्हशीचे दूध पिल्याने शरीरावर गाठी येतात असे खोटे मेसेज सोशल माडीवर व्हायरल करून काहीजण जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. असा कोणताही व्हायरस जनावरांच्या दुधात येत नाही त्यामुळे नागरिकांनी अश्या खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि बिनधास्तपणे दुधाचा वापर करावा असे आवाहन हिमायतनगर येथील पशुधन विकास अधिकारी सोनटक्के यांनी केलं आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी