नांदेड| राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद नांदेड विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा सायन्स कॉलेज नांदेड येथे दिनांक 13 /09 /2022 रोजी संपन्न झाली यात नांदेड जिल्ह्यातून 424 शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.डी.यू.गव ई सर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी(मा) मा. प्रशांत दिग्रसकर या कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद नांदेड प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी बिरगे मॅडम, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे , राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद उस्मानाबादचे रवींद्र स्वामी हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. ही संपूर्ण कार्यशाळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे जिल्हा समन्वयक सुभाष देगलूरकर यांनी अथक परिश्रम केले.
दिग्रसकर साहेबांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांना विविध उपक्रमात सहभागी करून घेतल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होईल असे सांगितले,बिरगे मॅडम यांनी शिक्षकांना मार्ग दर्शन करताना परिसंस्था म्हणजे काय याबद्दलची जाणीव अशा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना करून देता येईल असे सांगितले. अध्यक्षिय समारोपाच्या प्रसंगी प्राचार्य गवळी सरांनी परिसंस्था म्हणजे काय परिसंस्थेमध्ये असणारे जैविक व अजैविक घटकांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी राष्ट्रीय बाल विज्ञान महत्त्वाचा अशा प्रकारचे कार्य करीत आहे.
त्यासाठी ज्यास्तीत जास्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदे अंतर्गत राबवल्या जाणा-या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व उपस्थित सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेतून एक तरी प्रकल्प तयार करावे. मेळाव्याचे सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करावे ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक देगलूरकर शैक्षणिक समन्वयक जि. प. नायगाव चे मुख्याध्यापक आनंद रेनगुंटवार,कडलवार, लंगडापूरे, मादनुरे व सर्व विज्ञान शिक्षकांनी सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्र संचलन शैक्षणिक समन्वयक आनंद रेनगुंटवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार लंगडापूरे यांनी मांडले.या कार्यशाळेत 429 शिक्षक शिक्षकांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे व प्राचार्य गवई यांनी जिल्हा समन्वयक देगलूरकर यांचे अभिनंदन केले व भविष्यात अशाच प्रकारे परिश्रम घेऊन अधिकाधिक शाळांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगुन समाधान व्यक्त केले.