नांदेड| सीमावर्ती भागातील ग्रामस्थ आणि नागरिकांना वाहन परवान्यासाठी आरटीओ विभागाकडून सहज सुलभ व्यवस्था व्हावी. यासाठी स्वतंत्र बैठक लावण्यात येईल. अशी माहिती जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. सीमावर्ती भागातील ग्रामस्थांचे अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी यथायोग्य प्रयत्न करणार असल्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर पुढे म्हणाले की, नांदेड येथील आर टी ओ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील मध्यस्तांचा कारभार कमी करून लोकांना सहज सुलभ व्यवस्था करण्याविषयी यथायोग्य प्रयत्न करण्यात येईल. सीमावरती भागातील नागरिक ग्रामस्थ यांनी आपले म्हणणे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे प्रमुख समन्वयक यांच्या माध्यमातून मांडले होते.
यावेळी याविषयी स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सीमावर्ती भागातील प्रश्नांच्या विषयी दाखवलेल्या तत्परता बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान आरटीओ विभागाचे प्रमुख अधिकारी श्रीयुत शैलेश कामत यांनी कामात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न चालवल्याचे आरटीओ विभागाकडून सांगण्यात आले.