नांदेड। येथील तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार, कादंबरीकार कवियत्री स्नेहलता स्वामी यांनी लिहिलेल्या व संगीतकार आनंदीविकास यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठवाडा गीताचे विमोचन , मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे औचित्य साधून दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यामधील भारत माता मंदिर प्रांगणात मा.मंत्री पर्यटन, कौशल्य विकास , महिला व बालकल्याण महाराष्ट्र राज्य मुंबई व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सदर गीताचे होणार आहे.
सदर गीताला स्वर आहे प्रसिद्ध गायक सुरंजन खंडाळकर आणि सध्या कलर्स मराठीवर चालू असलेल्या सूर नवा ध्यास नवा ची मयुरी अत्रे यांनी दिला आहे. संगीत संयोजन प्रथमेश कानडे यांनी केले असून मिक्स व मास्टर आदित्य विकासराव देशमुख यांनी केले आहे या गीताची निर्मिती प्रक्रिया मिडियावर्क्स स्टुडिओ पुणे येथे झाली असून निर्माता पर्यटन विभाग महाराष्ट्र आहे .
मराठवाड्याचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा अभिमानाने सांगणारे हे गीत मराठवाड्याची ओळख खऱ्या अर्थाने सार्थ करणारे आहे याबद्दल जिल्हाधिकारी नांदेड खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांचे सह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.