नांदेड| आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान खरेदी करण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दिनांक 24 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर पर्यत ऑनलाईन नोंदणी करावी.
बिलोली येथील खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. धान उत्पादक शेतऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सातबारा, पिकपेरा, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, आधार कार्ड व इतर कागदपत्रे सोबत घेवून बिलोली कासराळी येथील खरेदी केंद्रावर यावे,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.