सुप्रसिद्ध लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्यां माया दामोदर,एमएची परिक्षा उत्तीर्ण -NNL


शेगाव।
येथील सुप्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्यां,कवयित्री,व विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या,माया दामोदर यांनी गो. से. विज्ञान,कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे वयाच्या 55 वर्षात 75 टक्के मार्क्स  घेऊन एम ए (मराठी ) परिक्षा उत्तीर्ण केली आहे.

आता पर्यन्त त्यांची विवीध प्रकारची 36 पुस्तके प्रकाशित झालेली असून, 19 पुस्तके त्यांची प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. शिक्षणाला वयाची अट नसते. कोणत्याही वयात व्यक्ती शिक्षण घेऊ शकतो. त्याचा उपयोग स्वत:ला व समाजालाही होत असतो ,याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महामानव  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  हे होत.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन,माया दामोदर या शिक्षण घेत आहेत.

लगन,जिद्द,सातत्य,आवड,निष्ठा,एकाग्रता या सर्व गुणांमुळे माया दामोदर कोणत्याही कामात यशस्वी होतात. हे त्या प्रत्येकक्षपणे दाखवून देतात. त्यांच्या या कर्तृत्वाचा आदर्श ईतर मुलींनी व स्त्रियांनी घ्यावा. या यशाचे श्रेय त्या आपले मुलं,ॲडव्होकेट पुजा महान,आशीष दामोदर,प्रशीक दामोदर ,.वंचीतचे महाराष्ट्र उपाध्यक्ष,शरदभाऊ वसतकार,आणि प्राचार्य, धनंजय तळवणकर,प्रा.शीतल बोबडे,प्रा.अनिता सातव, प्रा.महल्ले मॅडम, यांना देतात.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी