महिला व बालविकास विभागाच्यावतीने पोषण माह सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन -NNL


नांदेड|
महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय पोषण माह सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन बालगृह, एक निरिक्षण गृह, दोन विशेष दत्तक गृह येथे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी एम. एस. वाघमारे यांनी सही पोषण देश रोशन व स्वस्थ बालक बालिका या संकल्पनेवर आधारित पोषण माह कार्यक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. 

या कार्यक्रमाला भारतीय जीवन विमा महामंडळाचे उपव्यवस्थापक पाडुरंग भातलवंडे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजवंतसिंग कदम, जिल्हा परिवीक्षा सदस्य अे. पी. खानापुरकर, एस. के. दवणे, एस. आर. दरपलवार, ग. वि. जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात शून्य ते 18 वयोगटातील बालकांची वजन व उंची मापन, बालकांचे वैयक्तिक  स्वच्छता, कृती कार्यक्रम वारंवार हात धुणे, नखे कापणे, केस कापणे, सनिटॉयझरचा वापर, वस्तुची साफ सफाई व निर्जतुकीकरण, बालगृह स्वच्छता-पाणी याबाबतची माहिती देण्यात आली. याप्रसंगी बालगृहातील सर्व प्रवेशितांचे अद्यावत अहवाल, बालगृहात आरोग्यदायी किचन गार्डन करणे, बालगृहातील बालक, कर्मचारी यांच्यात आहार नियोजन, प्रतिनियुक्त अन्न, स्वच्छतेबाबत चर्चा घडवून आणणे, राष्ट्रीय पोषण माह या अभियानावर आधारित चित्रकला स्पर्धा, कविता स्पर्धा, फिल्प शो अशा विविध स्पर्धा, पथनाट्य बालगृहातील बालकांसाठी घोषवाक्य लिहिणे, इत्यादी उपक्रम राबविणार असल्याची माहिती एम.एस.वाघमारे यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी