डोळ्यात मिरचीची पूड टाकून लाखोची बैग घेऊन पाळलेल्या चोरट्याना अटक -NNL


नांदेड|
डोळ्यात मिरचीची पूड टाकून लाखो रुपयाची रक्कमेची बैग हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरट्यांचा शोध लावून सदर गुन्हयातील आरोपीतांचा अत्यंत जलद गतीने त्यांना अटक करण्यात आली आहे.  

पोलीस स्टेशन मुखेड, गुरनं २६९/२०२२ कलम ३९ भादवि. गुन्हयातील फिर्यादी नामे के. नरसीमल्लु पि. के. बालोजी वय ६० वर्ष व्य शेती/विट भटटी चालक रा. घाणापुर मंडल कुलकचेरला जि. विकाराबाद राज्य तेलंगणा यांनी पोलीस स्टेशनला येवुन फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार दि.०४ सप्टेंबर २०२२ रोजी बावनवाडी येथील विट कामगारांना उचल पैसे देवुन सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मी व माझे सोबत मुकादम चंदर दाडी रा. वेंकटपुरा कार चालक इ. मल्लेश. इ. नरसिमलु असे बावनवाडी येथुन मुखेड येथे जात असताना बावनवाडी ते बावनवाडी फाटयाचे दरम्यान रोडवर आमचे कारचे समोर एक व्यक्ती त्याचे ताब्यातील मोटारसायकल आणुन आडवी लावली. 

त्यामुळे आम्हाला कार थांबवावी लागली. अचानक रोडच्या कडेला दबा धरुन बसलेले चार इसम आमचे कारकडे आले. त्या पाच जणांनी आम्हाला चाकुचा धाक दाखवुन आमचे अंगावर मिरची पावडर फेकुन मुनिम चंदर दाडी यांचे हातात असलेल्या बॅग मध्ये एकूण 140,000/- (एक लाख चाळीस हजार रूपये) असलेली ती बॅग बळजबरीने हिसकावुन घेवुन रोडचे कडेला असलेल्या जंगलात पळुन गेले. मोटार सायकलवर आलेला व्यक्ती मोटार सायकल घेवुन बावनवाडीकडे पळाला. वगैरे मजकुराचे फिर्याद वरून वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 

सदर गुन्हयाचा तपास प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, निलेश मोरे. अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. सचिन सांगळे, उपविपोअ, देगलुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहा. पोलीस निरीक्षक किशोर बोधगीरे, पोलीस उप निरीक्षक गजानन काळे, गजानन अन्सापुरे, भारत जाधव पोलीस अंमलदार शिवाजी आडबे, बळीराम सुर्यवंशी, किरण वाघमारे, प्रदीप शिंदे, सिध्दार्थ वाघमारे, गंगाधर चिंचोरे योगेश कोकणे, मारोती मेकलेवाड यांचे पथकाने केला असुन, सदर गुन्हयातील आरोपीतांचा अत्यंत जलद गतीने शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सहाय्यक किशोर बोधगीरे हे करीत आहेत.


 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी