उस्माननगर, माणिक भिसे। देशरक्षणार्थ सैन्यदलात दाखल झालेल्या कंधार तालुक्यातील शिराढोण येथील राजेश्वर आनंदराव भुरे या लष्करी जवानाला वीरमरण आले आहे.६ सप्टेबर मंगळवारी रोजी मुळगाव शिराढोण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.ते इएमई बटालियनमध्ये कार्यरत होते. हैद्राबाद मधील सिकंद्राबाद या ठिकाणी कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आले आहे.
शिराढोण येथील रहिवासी राजेश्वर आनंदराव भुरे हे गेल्या 13-14वर्षा पासून इएमइ बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. दिवंगत जवान राजेश्वर भुरे यांच्या पश्चात आई, वडिल,पत्नी, एक मुलगा 2मोठे भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 6सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.