अर्धापूर, निळकंठ मदने| अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील रहिवासी संदिप इंगोले हे मालेगाव जवळील रेडचिली ढाब्यावर रात्रीच्या सुमारास थांबले असता,त्यांच्यावर पाळत ठेवून स्कुटीवरुन तोंडाला रुमाल बांधून दोघाजणांनी धारदार शस्त्राने त्यांच्या शरीरावर प्राणघातक हल्ला करुन ठार केले. त्या दोन आरोपींना रवीवारी रात्री पोलीसांनी अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केल्यावर आठ दिवसांची पोलीस कोठडी मागीतली. न्यायमुर्ती ने ३ दिवसांची ८ सप्टेंबरपर्यत दोन आरोपींना पोलिस कोठडी दिली. आरोपी मालेगावचे निघाल्याने पुर्ववैमन्यशातून ही घटना झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. एका दिवसात आरोपींचा झडा लावून अर्धापूर पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव जवळील रेडचिली ढाब्यावर शनिवारी रात्री ११:३० वा.संदीप चंपतराव इंगोले रा.मालेगाव हे थांबले होते, त्यांच्यावर दोघांनी तोंडाला रुमाल बांधून हातात धारदार तलवार व चाकू घेऊन संदीप इंगोले यांच्या दिशेने येऊन पाठीमागून पाठीवर व समोरुन छातीवर सपासप वार करुन, तु आमच्या कुटुंबाला अर्वाच्य भाषेत शिव्या का देतोस ? असे ते दोघे म्हणत वार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी पोलिस सुत्रे फिरवीत रवीवारी उशीरा मालेगाव येथील आदिनाथ परसराम इंगोले वय (२१) व एक १७ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
सोमवारी अर्धापूर न्यायालयात दोन्ही आरोपींना अर्धापूर पोलीसांनी ८ दिवसांची पोलीस कोठडी मागीतली,तर न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली,आरोपीने घटनेत वापरलेली आदि सामानासह, शस्त्रास्तांचा पोलीस तपास घेत आहेत, विभागीय अधिकारी अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक अशोक जाधव, पोउनी साईनाथ सुरवसे,पोउनि कपील आगलावे,पोउनि तय्यब अब्बास, कैलास पवार, राजेश घुन्नर,पप्पू चव्हाण,गुरुदास आरेवार, संतोष सुर्यवंशी, तुकाराम बोईनवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली, आरोपींविरुद्ध ३०२,२९४,३४ भादवी प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधीक तपास पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.