अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील मालेगाव येथील युवासेनेच्या सर्कल प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत युवा जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
मागील अनेक दिवसापासून युवासेनेत मरगळ आल्याने युवा सेनेचे सर्कल प्रमुख व मालेगाव सर्कल मधील पदाधिकाऱ्यांनी युवा सेनेला जय महाराष्ट्र करत अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पवन इंगोले, ज्ञानेश्वर इंगोले, शिवम भोजगंडे, शुभम कदम ,अंकुश कल्याणकर, सुधीर इंगोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला.