नविन नांदेड। जिल्हा परिषद प्रशाला विष्णुपुरी येथील एन एम.एस परिक्षेत सात विद्यार्थी पास झाले आहेत.या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
संस्कार, गुणवत्ता आणि प्रगती ही तीन ध्येय घेऊन जि.प. विष्णुपुरी जिल्हयातील गुणवत्तापूर्ण प्रशाला म्हणून परिचीत आहे. शाश्वत गुणवत्ता निर्माण करण्यासाठी सदरील प्रशासत विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी घेतली जाते. याच श्रेणीतील एन.एम एम. एस ही परिक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल, असलेल्या घटकांना सबल करण्यासाठी शासनातर्फे घेतल्या जाते.
अशा अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षेचा नुकताच निकाल लागून सदरील परीक्षेत विष्णूपूरी हायस्कूलचे सात विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक म्हणून प्राप्त झाले आहेत. यामध्ये चैतन्य कोल्हे, रोहिणी,जाधव, गणेश पांचाळ, श्रेया हंबर्डे, सार्थक येवले, सृष्टी येवले आणि अच्यूत लोंढे यांनी यश प्राप्त केले आहे.
या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात भरीव मदत म्हणून सतिश गंगाधर राव महाजन, रमाकांत जोशी (क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेस, प्रकाश कोमटवार(निवृत्त पोलीस उपनिरीक्षक या दानशूर व्यक्तीमत्वांनी सदरील परीक्षेचे 20 सेट, पुस्तकरूपाने विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे यशसंपादन करण्यात मदत झाली आहे. सदरील यशस्वी विद्यार्थ्यास विषय शिक्षक म्हणून विकास डिग्रसकर, सोमनाथ बिदरकर, सौ. जयश्री शिंदे ,आनंद वळगे, पदमाकर देशमुख यांनी उपयुक्त मागदर्शन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव हंबर्डे,साहेबराव हंबर्डे, उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, संरपच संध्या विलासराव देशमुख, ऊपसरपंच ,अर्चना विश्वनाथराव हंबर्डे, मु.अ.एन.एन दिग्रसकर पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक,गणिततज्ञ कृष्णा बिरादार, उदय हंबर्डे, राजेश कुलकर्णी, एम.ए. खदीर, उज्जवला जाधव, व चंद्रकला इदलगावे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.