गटविकास अधिकारी मांजरमकर यांच्याकडे संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी
मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील मौजे मंग्याळ येथे सि.सि.रोड व पेव्हर ब्लॉकचे काम निकृष्ट असल्याची तक्रार हुलप्पा रामराव काटशेव यांनी मुखेडचे गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर यांच्याकडे नुकतीच केली आहे.
मंग्याळ येथे ग्राम पंचायत अंतर्गंत सि.सि. रोड व पेव्हर ब्लॉकचे काम चालु असुन सरपंच व ग्रामसेवकाच्या संगनमताने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत असुन संबंधीत यंत्रणा डोळेझाक करीत आहे. सदरील कामावर इंजिनियअर चे दुर्लक्ष असुन या कामाची क्वालीटी कंट्रोल मार्फत चौकशी करुन योग्य कार्यवाही करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असे हुलप्पा रामराव काटशेव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवदेनाच्या प्रती ग्रामविकास मंत्री मुंबई मंत्री,विभागीय आयुक्त औरंगाबाद,जिल्हाधिकारी नांदेड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडे काटशेव यांनी तक्रार दिली असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. तर या निवेदनाची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी काय भूमिका घेतील याकडे तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.