आगामी सण उत्सव निमित्ताने पारंपरिक वाद्यांचा उपयोग करावा ,पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे -NNL


नवीन नांदेड।
आगामी येणा-या नवरात्र,दसरा सणाच्या निमित्ताने मंडळ पदाधिकारी यांनी पारंपारिक वाद्य वृंद उपयोग करावा व रावण दहन सह धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त संबंधित पदाधिकारी यांनी नियमांचे पालन करून सण उत्सव शांततेत साजरे करून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आयोजित बैठकीत केले.

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नवरात्र ,दसरा ,रावण दहन, धमचक्र परिवर्तन दीनानिमित्ताने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन दि.२२ सप्टेंबर रोजी  पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते 

येणाऱ्या सण उत्सव काळात नागरिकांनी सतर्क राहून व मंडळ पदाधिकारी यांनी नियमांचे पालन करीत मिरवणूकीत पारंपरिक वाद्य वृंद व गुलाला ऐवजीं फुलांचा वापर करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक  घोरबांड यांनी  करून नियमांचे कडेकोट नियमांचे पालन करावे व सण उत्सव शांततेत साजरा करावा  या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुरेश थोरात परिसरातील  सामाजिक कार्यकर्ते,वैजनाथ देशमुख ,डॉ नरेश रायेवार, बालाजी देवस्थान समिती हडको चे अध्यक्षअरुण दंकोंडवार, सिडको बालाजी देवस्थान समितीचे अध्यक्ष साहेबराव जाधव, स्वामी, बी.आर.मोरे, यासह विविध मंडळांचे पदाधिकारी ,व महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती,या बैठकीला  महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय चे स्वछता निरीक्षक किशन वाघमारे यांच्या सह महावितरणचे सहायक अभियंता बोधनकर, परिसरातील मूर्तिकार, डीजे युनियनचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती, कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामीण पोलीस स्टेशन येथिल गोपनीय शाखेचे अंमलदार बालाजी दंतापले,  चंद्रकांत बिरादार,यांनी परिश्रम घेतले.या बैठिकाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नवरात्र महोत्सव मंडळ पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी