नादेड| नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय नांदेड येथे हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालया पूर्णा येथील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ. विजय पवार यांनी वरील वक्तव्य केले. हिंदी भाषा व रोजगार या विषयावर आपले विचार व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकल्यामुळे उपलब्ध असलेल्या विविध रोजगाराच्या संधी सोदाहरण स्पष्ट केल्या. हिंदी भाषा आज विश्वभाषा होण्याच्या मार्गावर आहे तसेच संपूर्ण जगामध्ये 80 टक्के जनमानस हिंदी भाषेचा वापर करीत आहेत. अशी अनेक उदाहरणे देऊन रोजगाराचे पर्याय विद्यार्थ्यांना सांगितले.
याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ. सौ. परविंदरकौर महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा मांडली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी विभागाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात निबंध, हस्ताक्षर, वक्तृत्व, पोस्टर मेकिंग, आणि काव्यवाचन या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना मंच उपस्थित करून दिला. या कार्यक्रमात सदरील स्पर्धेतील विजेते प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरणही करण्यात आले. हिंदी विभागाच्यावतीने सन 2021 - 2022 मध्ये *पत्रलेखन* या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात आला होता त्याचे प्रमाणपत्र वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. सुधीर शिवणीकर होते. त्यांनी अध्यक्षीय समारोपात उपस्थितांना हिंदी भाषेची प्रतिज्ञा दिली व हिंदी भाषा ही जनसामान्यांची भाषा आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेमुळे अनुवादक म्हणून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा अभ्यास करून या रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबू गिरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. श्यामसुंदर माधनुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सौ. मनीषा वाघमारे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालयातील डॉ. जीवन मसुरे, डॉ. सुग्रीव फड, प्रा. दत्ता बडूरे, डॉ. शशिकांत दरगू , डॉ. इरशाद अहमद खान, डॉ. संदीप काळे, डॉ. जाधव, डॉ. देशपांडे, डाँ. पंकज यादव, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. क्षमा करजगावकर, डॉ. सौ. संध्या ठाकूर आणि महाविद्यालयातील विविध विषयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.