बालाजी पाटील ढोसणे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
मुखेड| प्रतिनिधी सततच्या पावसाने व सलगच्या ऊघडीपने तालुक्यातील पिकांंचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. यामुळे शासन निर्णयाचा आधार घेत बालाजी पाटील ढोसणे यांनी सतत जिल्हाधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांना सर्व गोष्टीचा सततचा पाठपुरावा करुन मुखेड तालुक्यासाठी सोयाबिन,कापुस,तुर,ज्वारी या पिकासाठी पिकविम्याची 25 टक्के आगाऊ रक्कमेची अधिसुचना लागु करुन घेतल्याचे पिक विम्यासाठी वेळोवेळि लढा ऊभारणारे शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी सांगीतले.
याबाबत ढोसणे यांनी जिल्हा अधिक्षक रविशंकर चलवदे यांची भेट घेवुन पिक विम्याचा शासन नियमानुसार ऊत्पादनात 50 टक्के घट आल्यास जिल्ह्यात पिकविम्याच्या 25 टक्के आगाऊ रक्कम शेतकर्याच्या खात्यावर जमा करावी म्हणुन वाचा फोडली याची दखल घेत सतत तहसिलदार,कृषि अधिकारी,विमा कंपनीच्या अधिकार्याच्या संर्पकात राहत पंचनाम्यावर बारकाईने लक्ष ठेवत वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यास भाग पाडले त्यामुळे मुखेड तालुक्यातील महसुल मंडळ निहाय ऊत्पादनाची घट आली.
त्यामध्ये सर्वाधिक क्षेञ असलेल्या सोयाबीन पिकासाठी मुखेड 65.14 टक्के,जांब 65.99,जाहुर 65.03,चांडोळा 63.01,मुक्रामाबाद 65.06,बार्हाळी 66.07,येवती 67.07,अंबुलगा 68.08 अशी घट सोयाबीन पिकासाठी आली तर तुर,ज्वारी व कापुस पिकांमध्येही 50 टक्केपेक्षाही जास्तीची घट आल्याने ते फण पिक सर्व महसुल मंडळामध्ये त्या पण पिकांचा विमा ऊतरविलेल्या शेतकर्यांना लाभ मिळणार असल्याचे ढोसणे यांनी सांगीतले.यामुळे सततच्या पाठपुराव्यामुळे ढोसणे यांचे अभिनंदन होत असुन सदरील अधिसुचनेमुळे शेतकर्यातुन समाधान व्यक्त केले जात आहे.