हिमायतनगरातील शासकीय धान्य गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली चाळणी -NNL


हिमायतनगर|
शहरातील रेल्वेस्थानकाच्या बजावला असलेल्या शासकीय धान्य साठवण होणाऱ्या गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था चाळणी सारखी झाली आहे. त्यामुळे येथून ये - जा करताना मोठ्या परेशानीचा सामना करावा लागतो आहे.

शहर व तालुक्यातील गोर गरीब जनतेसाठी शासनाकडून मिळणारे धान्य साठवणुकीसाठी तहसील कार्यालयाचे गोदामं रेल्वे स्थानकानजीक आहे. या गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली असल्याने दुकानदारांना धान्य ने-आन करण्यासाठी मोठी कसरत कारवाई लागते आहे. 


याबाबत अनेकदा सूचना केल्या मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे शासकीय धान्य घेऊन तालुक्यात येणारे वाहनधारक रस्त्याच्या गंभीरतेला वैतागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची हि समस्या सोडविण्यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी धान्याची ने - आन करणाऱ्या वाहनधारकातून केली जात आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी