नांदेड। दि. 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेला "राडा" मराठी चित्रपट दर्शकाची तोबा गर्दी खेचत आहे. यात बालकलाकार वेदांत मठपती याचे डायलॉग हिट झाले असून याचे मिम्स तयार करून सोशल मिडीया युजर्स सर्वत्र शेअर्स करत आहेत. दिग्गज कलाकारा सोबत
वेदांत मठपती याचा मोठ्या रूपेरी पडद्यावरील "राडा" हा पहिलाच चित्रपट असून या पुर्वी वेदांत मठपतीने शॉर्ट फिल्म,एकांकीका,ग्रुप ड्रामा केले आहेत.तसेच वयाच्या तीसर्या वर्षा पासून विविध विषयावर भाषण करत असल्यामुळे बाल वक्ता म्हणून तो नांदेड जिल्ह्यात प्रसिध्द आहे.
वेदांतच्या आवाजातील गोडवा व मराठी भाषेवर असलेली चांगली पकड या मुळे त्याला अनेक शॉर्ट फिल्ममध्ये तथा बालनाट्यात संधी मिळत गेली. राडा या चित्रपटाची शुटींग नांदेड शहरात व अन्य ठिकाणी झाली आहे.
"राडा" चित्रपट फुल्ल ऑफ अॅक्शन,कॉमेडी, आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या या चित्रपटात वेदांत मठपती याने बालकलाकाराची महत्वपुर्ण भुमिका साकारली असून वेदांतच्या भुमिकेसाठी दर्शकांची मोठी दाद मिळताना दिसत आहे. राम शेट्टी निर्मित 'राडा' या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश सोपान नरवाडे यांनी केलं आहे. अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार,योगिता चव्हाण,मिलींद गुणाजी,संजय खापरे,गणेश यादव,अजय राठोड,गणेश आचार्य, निषिगंधा वाड अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहेत.