हदगाव, शे चांदपाशा। शहरातील हदगाव नादेड मुख्य प्रवेश रोडचे काम रखडले असुन, यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व वाहन धारकांना अतिशय ञास होत आहे.
विशेष म्हणचे या मुख्यप्रवेशाद्वराचे उद्घाटन राज्याचे माजी सा.बा. मंञी तथा नादेड जिल्ह्यातीचे पालकमंञी आशोक चव्हाण यांच्या हस्ते एक वर्षा पुर्वी धुमधडक्यात भरपावसात करण्यात आले होते. माञ केवळ कञाटदार हा राजकीय नेत्याच्या जवळचा असल्याने न.पा. प्रशासन ही त्यास राजकीय दबावपोटी ठोस अशी तंबी देण्यात येत नसल्याने व थातुर मातुर पञव्यव्हार करत आहे. परिणाम स्वरुप या बाबतीत किती ओरड केली तरी याचा काहीच परिणाम ठेकेदारांच्या कामावर होत नाही.
ही वस्तुस्थिती असल्याने आता वाहनधारक व नागरिक ही प्रशासनाच्या अश्या अडमुठ्या धोरणामुळे हतबल झाल्याचे दिसुन येत आहे. शहराचा मुख्यप्रवेश रोड एकच आसल्याने तसेच या रोडचे काम ही ऐन पावसाळ्यात सुरु करण्याचे कारण ही समजु शकलेले नाही. या छञपती शिवाजी महाराज प्रवेशद्वरा कमानीचे काम वैशिष्ट्येपुर्ण योजनेच्या अतर्गत ७५ लाख रु.असुन या बाबतीत थातुरमातुर काम करुन संबंधित कञाटदाराने बहुताशी रक्कम उचलल्याचे सागण्यात येते आहे.