लोहा| जुन्या लोह्यातील विमलबाई भाऊराव पवार यांचा सेवापूर्ती सोहळा निमित्ताने त्याचा एकात्मिक महिला बाल विकास प्रकल्प कार्यालय लोहा व नातेवाईक यांच्या वतीने सेवा निवृत्तीचा सत्कार सोहळा करण्यात आला
पर्यवेक्षिका विमलबाई भाऊराव पवार या अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून १६ वर्षाच्या सेवे नंतर निवृत झाल्या आहेत त्यांनी दापशेड येथे अंगणवाडी येथून सेवेला आरंभ केला. २०१० मध्ये पर्यवेक्षिका म्हणून त्यांनी पदोन्नती झाली.कर्तव्यदक्ष म्हणून त्याची ओळख होती या महिन्यात सेवानिवृत झाल्या.
शहरातील मंगल कार्यालयात त्याचा सेवानिवृत्त सत्कार पार पडला, यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंतराव पवार, नगरसेवक भास्कर पाटील पवार, पत्रकार ज्ञानोबा पवार, नामदेव पाटील पवार, भारत पाटील पवार, नगरसेवक संभाजी चव्हाण, पोलीस जमादार शिवाजी पवार यासह कार्यालयातल कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कौटुंबिक नातेवाईक मोठ्या संख्येनी उपस्थिती होते.