नादेड| कै.शिवसांब मनमथ मठपती अधिपरिचारीका पुरुष या पदावर उपजिल्हा रुग्णालय मुखेड जि.नांदेड येथे कार्यरत असताना त्यांचा दि.१३ सप्टेंबर २०१८ रोजी ऱ्हदयविकाराने त्यांचा मृत्यु झाला. अत्यंत शांत, संयमी आणि कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची ख्याती परिचित होती.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी उपजिल्हा मुखेड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी सामाजिक उपक्रम राबवित असतात. या वर्षी अशा दुर्मीळ व्यक्तीच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे नांदेड जिल्हा शिल्यचिकीत्सक डॉ.निळकंठ भोसीकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ किशोर कदम व डॉ सुधाकर तहाडे, मुखेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले, यांच्या मार्गदर्शनाखाली " भव्य मोफत लेप्रोस्कोपीक (दुर्बिणीद्वारे) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे " आयोजन करण्यात आले असून दोन दिवस रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजी ३० रुग्णावर व दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी २३ रुग्णावर असे एकूण ५३ रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच बरोबर एका गरोदर महिलेची सिझर शस्त्रक्रिया केली.
डॉ रमेश बोले लेप्रोस्कोपीक सर्जन यांनी शस्त्रक्रिया करण्याचे काम केले तर लेप्रोस्कोपीक (दुर्बिणीद्वारे) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी स्त्रीरोग तज्ञ डॉ देवकत्ते शोभा, भूलतज्ञ डॉ अर्चना पवार, डॉ संतोष टंकसाळे ,डॉ नुन्नेवार प्रसाद, डॉ गोपाळ शिंदे, डॉ शैलेश देशमुख, डॉ उमाकांत गायकवाड, डॉ शिल्पा कळसकर, डॉ संदीप काकांडीकर, डॉ बालाजी बिडवे, डॉ अमित मास्कले, डॉ प्रिया खंडागळे, डॉ हणमंते, डॉ जयश्री सुडके,डॉ वडेर शिवसांब, श्री पी.जी.सगर,श्री एम एच.तोटवाड, श्रीमती फते लषकरे,श्रीमती पद्मा पांचाळ,श्रीमती लता पांचाळ, श्रीमती केंद्रे, श्रीमती यमलवाड ,श्रीमती घोडेकर अनिता,उषा गिरी, श्रीमती सोनवने तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे श्री व्यंकट माचनवाड व्यंकट आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप),श्री चंद्रकांत जाधव, प्रवीण खालसे, नर्सिंग गुरफळे, शिवराज तोटेवाड यांनी उत्कृष्ट काम करून सदरील शिबीर यशस्वी केले.