आ. माधवराव पाटील जवळगावकरांच्या माध्यमातून सर्व सरपंचांना न्याय मिळून देण्यासाठी कटिबद्ध - परमेश्वर गोपतवाड -NNL

हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेची अध्यक्षपदी सरपंच परमेश्वर गोपतवाड यांची निवड

आ. माधवराव पाटील जवळगावकरांनी केलं अभिनंदन 


हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील सर्व सरपंच माझे भाऊ आहेत असे समजून कोणताही पक्षपात न करता आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून सर्व सरपंचांना न्याय मिळून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. अध्यक्ष जरी झालो तरी सर्वच सरपंच माझ्यासोबत अध्यक्ष आहेत. त्यामुळे या पदावरून काम करताना सर्वाना सामान न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवाचन सरपंच संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा सवना ज. चे सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी दिले.


बुधवारी येथील पंचायत समितीच्या कै. वसंतराव नाईक सभागृहात तालुका सरपंच संघटनेची बैठक संपन्न झाली या. बैठकीत सरपंच संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली असुन, यासाठी दोन उमेदवार असल्याने निवडणूक घेण्यात येऊन अध्यक्षपदी बहुमताने सवना ज. चे सरपंच परमेश्वर गोपतवाड यांची वर्णी लागली आहे. त्यानंतर त्यांचा सर्वानी स्वागत सत्कार करून शभेच्छा दिल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. सरपंच संघटनेच्या बैठकीची रुपरेषा प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी मांडली. तालुका कार्यकारिणीच्या निवडीबद्दल गणेश शिंदे, सरपंच सुधाकर पाटील, कानबा पोपलवार, अशोक पाटील, विशाल राठोड, संजय माझळकर, बाला पाटील, आदींनी विचार व्यक्त केले. 

सरपंच संघटना अध्यक्षपदासाठी सवना ज. चे सरपंच परमेश्वर गोपतवाड, कारला पिचोंडीचे सरपंच गजानन पाटील कदम, टाकराळा येथील सरपंच बाला पाटील, हे तिन सरपंच इच्छुक होते. त्यामुळे पक्षनिरीक्षकासह व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांनी तिघांचे एकमत करण्याची जबाबदारी घेतली होती. यात कारला येथील सरपंच गजानन पाटील कदम यांनी माघार घेतली. त्यामुळे परमेश्वर गोपतवाड आणि बाला पाटील यांच्यात लढत झाली. गुप्त पध्दतीने झालेल्या मतदानात गोपतवाड यांना 23 मते तर बाला शिंदे यांना 20 मते पडली असल्यामुळे 3 मतांनी गोपतवाड विजयी झाल्याचे पक्ष निरीक्षकांनी जाहीर केले. 


अध्यक्ष निवडीत एकमत झाले नसल्यामुळे गुप्त पध्दतीने मतदानाची प्रक्रिया घ्यावी लागली. अध्यक्ष निवडीनंतर इतर कार्यकारीणीची बिनविरोध निवड करून उपाध्यक्ष पदी बाला पाटील टाकराळेकर, सचिव विशाल राठोड, कोषाध्यक्ष सौ वंदना कानबा पोपलवार, सदस्य सुधाकर पाटील सोनारीकर, सौ. स्वाती साईनाथ शिंदे, गौतम दवणे, सौ. अनुसया भिमरवाड, सौ. काशीबाई ठाकूर, सौ. दिव्या जैस्वाल, मारोती वाडेकर, सल्लागार सौ. यशोदाबाई प्रल्हाद पाटील, सौ. प्रभावती गणेश शिंदे, संजय माझळकर, आदिंची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच संघटनेच्या अध्यक्षासह कार्यकारिणीचा सत्कार सरपंच बांधवांनी केला. यावेळी नूतन अध्यक्षांना पत्रकार सांघटनेच्या वतीने उपस्थित पत्रकार बांधवानी शुभेच्छा देऊन पुढील २५ वर्ष अध्यक्षपदाचा कार्यकाळ गाजविण्यासारखे काम करावे अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या.

परमेश्वर गोपतवाड यांच्यासह संघटनेच्या कार्यकारिणीचे अभिनंदन - आ. जवळगावकर


सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या व सरपंच पदाचा दिर्घ काळ अनुभव असणाऱ्या व्यक्तीमत्वास सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाची संधी सवना ज.चे विद्यमान सरपंच परमेश्वर गोपतवाड यांना मिळाली. त्यांचे मनापासून, अभिनंदन येणाऱ्या काळात तालुक्यातील सरपंच बांधवाच्या समस्या गोपतवाड शासन दरबारी मांडून न्याय देतीलच. त्याबरोबरच मी देखील सरपंच बांधवाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे सांगितले. तसेच आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी परमेश्वर गोपतवाड यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून अभिनंदन केले. 

सरपंच संघटनेच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणार - परमेश्वर गोपतवाड


सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर परमेश्वर गोपतवाड म्हणाले की, सरपंच बांधवांनी विश्वास व्यक्त करून निवड केली आहे. तालूक्यातील सरपंच बांधवांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही सरपंच संघटनेसह सर्व सरपंच बांधवांना विश्वासात घेऊन आपल्या समस्या तडीस नेण्यासाठी सदैव आपल्या सेवेत तत्परतेने काम करणार असल्याचे सांगितले. यासाठी सर्व पत्रकारांनी देखील सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी