बाबा बंदासिंघ बहादर मिलाप दिनानिमित्त 3 सप्टेंबर रोजी नांदेड येथे विशेष कार्यक्रम -NNL


नांदेड।
बाबा बंदासिंघ बहादर मिलाप दिनाचे आज दि 3 सप्टेंबर रोजी नांदेड येथिल बंदा घाट गुरुद्वारामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

लुधियाना पंजाब येथील बाबा बंदासिंघ बहाद्दर इंटरनॅशनल फौंडेशन ची टिम नांदेड येथे दाखल झाली असून टीम चे प्रमुख कृष्णकांत (के.के.) बावा जत्थासह या मिलाप कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शीख धर्माचे दहावे गुरू श्री गुरू गोबिंदसिंघ जी महाराज व बाबा बंदासिंघ बहादर यांची ३ सप्टेंबर याच दिवसी नांदेड येथिल बंदा घाट गुरुद्वारा स्थळी भेट झाली होती. तो सुवर्ण भेटीचा दिवस मिलाप दिवस म्हणून मागील १६ वर्षे पासून साजरा केला जातो. 

आज  3 रोजी सकाळी ११ वा हा मिलाप दिनाचा विशेष कार्यक्रमआयोजित करण्यात आला आहे. संत महापुरुष,साद संगत यांची प्रमुख उपस्थिती यावेळी  राहणार असल्याचे बाबा बंदा सिंघ बहादर इंटरनॅशनल फौंडेशनचे अध्यक्ष कृष्णकांत बावा यांनी सांगितले. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान बाबा बंदा सिंघ बहादर इंटरनॅशनल फौंडेशनचे अध्यक्ष कृष्णकांत बावा 125 जणांचा जथा घेऊन काल सचखंड एक्सप्रेस ने लुधियाना येथून नांदेड येथे आलेले आहेत. त्यांचं नांदेड रेल्वे स्थानकावर पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली नानक साई फाऊंडेशन च्या टीमने जोरदार स्वागत केले.  

बंदा सिंग बहादूर, एक शीख योद्धा आणि खालसा सैन्याचा सेनापती होता. वयाच्या 15 व्या वर्षी, त्यांनी तपस्वी होण्यासाठी घर सोडले आणि त्यांना माधो दास बैरागी हे नाव देण्यात आले. त्यांनी गोदावरी नदीच्या काठी नांदेड येथे मठाची स्थापना केली. गुरू गोबिंद सिंघ जी यांच्या हुकमानुसार ते पंजाब ला गेले आणि तेथे त्यांनी खालसा राज्य स्थापन केले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी