हदगाव, शे चांदपाशा। मागील महाविकास आघाडीच सरकार नसुन महाभकास आघाडीच सरकार होत राज्याच विकास करण्या ऐवजी महावसुलीच सरकार होत अशी टिका राज्याचे महसुल पशुसंवर्धन दुग्धविकास मंञी राधाकृष्ण -विखे पाटील यांनी हदगाव तालुक्यातील वाळकी (बाजार ) येथे रविवारी आयोजित केलेल्या नागरी सत्कारात केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नादेड लोकसभाचे खा. प्रताप पाटील चिखलीकर हे होते या वेळी माजी केद्रिय मंञी सुर्यकांन्ता पाटील, खा. प्रताप पाटील, आ.राम पाटील रातोळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महसुल मंञी राधकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदीजीनी कोरोनाच्या काळात फार भरीव कार्य केले जगाच्या पाठीवर आपला एकमेव देश आहे. जो की दोनशे कोटी लोंकाच लस्सीकरण मोफत करण्यात आल. पंतप्रधान मोदीजीन ८०% टक्के लोकांना मोफत धान्य दिलं आहे माझी अशी अपेक्षा होती की पंतप्रधान मोदीजीच छातीवर फोटो लावून आम्ही मोदीचे कार्यकर्ते आहोत अस करायला हव होत. अशी अपेक्षा व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की धान्य केद्रशासनाचे बोर्ड माञ राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या लोकांचे मागील सरकारला पेट्रोल डिझेल दर कमी करा म्हणून म्हणायचो माञ यांनी निर्णय असा घेतला की दारु स्वस्त केली.
ती पण किराणा दुकानावर विकण्याची परवानगी दिली शेतक-याची वीज कापली महाविकास अघाडी सरकार फक्त 'लुटमार ' करित असतांना १०० कोटी रु. वसुली मध्ये एक मंञी जेल मध्ये तर दुसरा अतिरेक्याशी संबध मुळे गजाआड तर तिसरा रोज सकाळी भुकणारा जेल मध्ये आहे जर सरकार बदललेले नसते तर अणखीन किती महाविकास अघाडीचे जेल मध्ये गेले असते असा प्रश्न महसुल मंञ्यानी उपस्थित केला महाविकास आघाडीच सरकारने आपल्या कार्यकाळात फक्त जनतेची दिशाभुल करायच काम केलं जाऊ तिथे खाऊ जनतेचे खिसे कापायचे आपले खिसे भरायचे असा गंभीर आरोप ही त्यांनी यावेळी केला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस वर ही त्यांनी भरपूर टिका केली. शिवसेनेचे जे काही शिल्लक आमदार खासदार आहेत ते पण फोन लावत आहेत अस त्यांनी यावेळी सागितले.
खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची लोकप्रियता ....
नादेड लोकसभाचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांची हदगाव तालुक्यात महसुल मंञ्याच्या नागरी सत्काराच्या वेळी प्रत्येक जण त्यांच्या कडे हिंगोली लोकसभेचे नेतृत्व जाव अशी चर्चा ऐकवायास मिळत होती...माजी केद्रिय मंञी सुर्यकांन्ता पाटील यांनी मुंबईला जायच की दिल्लीला जायच हे त्यांनी ठरवाव आमच सहकार्य राहील अस खा प्रताप पाटील यांनी म्हणताच जोरदार टाळ्यांचा आवाज नागरिकातुन आला...महसुल मंञी राधाकृष्ण विखे पाटील हे स्थानिक पञकारांना भेट दिली नाही तसेच जनावारांच्या विषाणू जन्य पादुर्भाव झालेल्या विषाणू जन्य लम्पी चर्मरोग बाबतीत अधिका-याच्या आकडेवारी वरच त्यांनी अधिका-याच कौतुक केले माञ हदगाव व हिमायनगर तालुक्यात प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे माञ स्थानिकाकडून जाणून घेतले नाही ...