सन 2019 आणि 2020 चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर -NNL


मुंबई|
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन 2019 आणि 2020 या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार कल्याणजी गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शौनक अभिषेकी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला आहे. 

मराठी चित्रपटासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे. किर्तनासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गुरुबाबा औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. शाहिरीसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अवधूत विभूते यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कै. कृष्णकांत जाधव (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आला आहे. नृत्यासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शुभदा वराडकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  जयश्री राजगोपालन यांना जाहीर करण्यात आला आहे. कलादानासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अन्वर कुरेशी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  देवेंद्र दोडके यांना जाहीर करण्यात आला आहे. 

वाद्यसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सुभाष खरोटे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  ओंकार गुलवडी यांना जाहीर करण्यात आला आहे.तमाशासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शिवाजी थोरात यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  सुरेश काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककलेसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सरला नांदुलेकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कमलाबाई शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजनसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मोहन मेश्राम यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  गणपत मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी आणि संगीताचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2020-21 व 2021-22 या वर्षांसाठीचे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2020 - 21 साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना तर 2021 - 22 साठीचा पुरस्कार दत्ता भगत यांना जाहीर करण्यात आला आहे. सन 2020 - 21 साठीचा संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दिप्ती भोगले यांना तर 2021 - 22 साठीचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी