पांढरा ध्वज चढवून केला दुघधाभिषेक
हिमायतनगर| श्रावण शुक्ल ४ दि ०२ ऑगस्ट रोजी आलेल्या नागपंचमी दिनी हिमायतनगर शहरातील जाधव यांच्या शेतात उभी असलेल्या ६ फुटाच्या शेषनागाच्या मूर्तीच दर्शन घेण्यासाठी शहरातील महिला पुरुष भाविकांनी गर्दी केली होती. पांढराध्वज, लाह्या फुटाणे, नारळ आणि पेढ्याच्या प्रसादाने अनेकांनी दर्शन घेऊन मनोकामना केली.
हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे सर्वाधिक सण - उत्सव श्रावण महिन्यात येतात. गेल्या २ वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदा प्रथमच नागपंचमी उत्सवापासून हिंदू सणांची रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे आज नागपंचमीच्या औचित्य साधून शहरातील महैला मंडळी पुरुष व चिमुकल्या बालकांनी येथील शेषनागाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर सायंकाळी अनेकांनी आपल्या भावाचे डोळे धूउन लाह्या फुटण्याचा प्रसाद देऊन उत्सव साजरा केला.
शहरातील शेषनागाची मूर्ती हि ६ फुटाची असून, गेल्या अनेक वर्षांपासून ऊंस सावलीत बोरीचे आणि लिंबाच्या झाडाखाली उभी आहे. पूर्वीच्या काली जेंव्हा भागात विष्णू शिवाची आराधना करत होते. त्यावेळी त्यांना ऊन आणि पाण्यापासून वाचविण्यासाठी शेषनागाचे रूप धारण केले होते. येथील मूर्ती तश्याच अवतरातील असून, या मूर्तीला बाजूला करून मंदिराचे बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला मात्र अचानक मूर्ती खाली पडली. त्यावेळी अनेकांनी मूर्तीला उचलण्याचा प्रयत्न केला मात्र मूर्ती उठविता आली नाही. जेंव्हा मंदिर बांधकामाचा विषय रद्द केला. तेंव्हा सर्व शेतकऱ्यांना मूर्ती उभी करून ठेवता आली.
तेंव्हापासून मंदिराच्या बांधकामाचा विषय बाजूला ठेवण्यात आला आहे. या मूर्तीला पांढरा धज चढवून अभिषेक पूजा केली जाते अनेकजण आपल्या इच्छाशक्तीप्रामणे दुध, पंचामृत आणि साध्या पद्धतीने पूजा करून मनोकामना करतात. आज याच नागपंचमीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिकांनी शेषनागाचे दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केले आहे. तर ग्रामीण भागातील काही लोक याच दिवशी जुगार खेळून नागपंचमीला हि कुप्रथा चालवित असल्याने महिला मण्डळीतून नाराजी व्यक्त केली जात आहे.