नांदेड। काळेशवर विष्णुपुरी महादेव मंदिर येथे श्रावणमास निमित्ताने पहिल्या सोमवारी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती, महाअभिषेक व महापुजा या नंतर दर्शनासाठी य देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता तर नंदीघाट किना-यावर जिवरक्षक दल तैनात करण्यात आले होते.
नांदेड तालुक्यातील जागृत व जाज्वल्य असे विष्णुपुरी नांदेड येथील काळेशवर मंदिर असून श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संयुक्तपणे मिटींग घेऊन दर्शन सोयीस्कर होण्यासाठी दर्शन रांग व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. १ आगसष्टरोजी पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मंत्रोच्चार व विधीवत पूजा पुजारी कैलास धनमणे, सतिश धनमणे,गुरूलिंग धनमणे, गणेश धनमणे, रामेश्वर धनमणे, संभाजी धनमणे यांनी केली व सकाळी महाआरती नंतर भाविक भक्तांसाठी दर्शन देण्यात आले, मंदिर देवस्थान समितीचे शंकर हंबर्डे, बालाजी हंबर्डे,धारोजी हंबर्डे, ऊतम हंबर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे, गोविंदराव हंबर्डे व संरपच प्रतिनिधी राजु हंबर्डे यांच्या सह गावातील स्वयंसेवक,व पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती.
पहिल्या सोमवार असल्याने सकाळ पासून भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात, आठ उपनिरीक्षक ,८३ महिला व पुरुष पोलीस अंमलदार ,१५ होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता तर नंदीघाट किना-यावर जिवरक्षक दल तैनात करण्यात आले होते.मंदीर परिसरात विविध दुकाने मोठया प्रमाणात थाटली होती.सायंकाळी गंगा आरती नंतर काळेशवर आरती करण्यात आली. दुपारी महाआरती नंतर मायवन मित्र मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,या महाप्रसादाचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला.