भोकर। आझादी का अमृत महोत्सवी वर्ष संपुर्ण भारतात साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने डाक अधीक्षक मा.श्री.आर.व्ही. पालेकर साहेब नांदेड व डाक निरीक्षक मा.श्री.मुंडे साहेब व योगेश काटोले साहेब भोकर यांनी घर... घर. पोस्ट ऑफिसचे खाते ही योजना राबविण्यात येत आहे.
डाक विभागातील सर्व कर्मचारी वाड्या तांड्यात, गावागावात, शहरातील गल्ली गल्लीत मेळावा व स्टोल लावून प्रत्येकाच्या घरी जाऊन डाक विभागाच्या विविध प्रकारच्या योजनाची माहिती देण्यात येत आहे. या मध्ये सुकन्या समृद्धी खाते योजना, आर.डी. खाते, पी.पी.एफ.,अटल पेन्शन योजना, ग्रामीण डाक जीवन विमा योजना, अपघाती विमा २० लाखाचा वार्षिक हप्ता ३९९रुपये योजना, डाक जीवन विमा योजना या सर्व योजनांची माहिती मुख्य दैनिक पेपर मधून वाचवण्यासाठी मिळत आहे.
तसेच तोंडी व ध्वनी द्वारे व बैंनर,पोस्टर, योजनेचे जाहिरात पत्रक वाटप द्वारे प्रसार व प्रचार जाहिरात मोठ्या प्रमाणावर माजी डाक मार्केटिंग अधिकारी व पोस्टमन सुरेश सिंगेवार भोकर शहरात गल्ली गल्लीत करीत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी मोठ्या उत्साहात डाक विभागाच्या विविध योजनाचे खाते उघडून घेत असल्याचे दिसून येते आहे. नागरिकांनी जास्ती जास्त बचत पोस्ट ऑफिस मध्ये करावे असे अहवान पोस्टमन सुरेश सिंगेवार करीत आहेत.