नांदेड| मराठा आरक्षणासह समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी विनायक मेटें यांनी प्रभावी भूमिका मांडली असून त्यांच्या अकाली जाण्याने मराठा समाजाने आपला बुलंद आवाज गमावला असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे .शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधना निमित्त शनिवार दि २० ऑगस्ट रोजी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने विजय नगरच्या हनुमान मंदिराच्या सभागृहात शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते यावेळी देशाच्या माजी राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर, कामाजी पवार,मिनलताई खतगांवकर, इंजि.तानाजी हुसैकर,विठ्ठल पाटील डख, भुजंग पाटील, मिलिंद देशमुख, माधव पाटील देवसरकर, सोपानराव श्रीसागर,संकेत पाटील,सुनील पाटील कदम, गणेश शिंदे,दशरथ पाटील ,उमेश पाटील , आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, विनायक मेटें यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी ,मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. सामाजिक आणि समाजाभिमुख कामांसाठी ते नेहमीच पुढे असायचे त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या करून अखेर पर्यंत संघर्ष केला.एक संघर्ष करणारा चळवळीतील नेता कायमचा पडद्याआड गेला असल्याचे म्हणत भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
यावेळी देशाच्या माजी राज्यमंत्री सूर्यकांता पाटील,खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. अमरनाथ राजूरकर आदींनी ही .शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या कार्यांवर प्रकाश टाकत श्रद्धांजलीही अर्पण केली या प्रसंगी प्रा.संतोष देवराये, नानाराव कल्याणकर, सुनील कदम, पंडीतराव पवळे, संभाजी शिंदे, सुचिता जोगदंड, गणेश शिंदे, ओकमार सूर्यवंशी, सुरेश घोरबांड,दीपक पाटील राजुरकर, दिलीप शिरसाट, प्रविण जाधव, प्रा.प्रभाकर जाधव, सदा पुय्यड, मंगेश कदम, शिवाजी हंबर्डे, गजानन काळे, दशरथ कपाटे, विक्रम बामणीकर, स्वप्नील सूर्यवंशी, दिपक पावडे, संजय वटफळीकर, अशोक कदम, रवी ढगे, ॲड.भोसले विनायक, मुन्ना कदम, माधव केरुरे, राजू ताटे, अण्णासाहेब पवार, सोपान क्षीरसागर, सुनील पाटीलसह मराठा समाजातील विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.