सहसचिवपदी कॉ.देवराव नारे व कॉ.वंदना वाघमारे यांची निवड
नांदेड| भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा अधिवेशनात जिल्हासचिवपदी कॉ.शिवाजी फुलवळे तर सहसचिव म्हणून कॉ.देवराव नारे व कॉ.वंदना वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन पक्ष कार्यालयात राज्य सहसचिव कॉ.राम बाहेती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या अधिवेशनाच्या अध्यक्ष मंडळात कॉ.के.के.जांबकर, कॉ.शांताबाई पवळे, कॉ.शांताबाई पवळे, कॉ.लक्ष्मणराव हसनाळीकर हे होते. यावेळी बोलतांना कॉ.राम बाहेती यांनी केंद्र सरकार श्रमीक कष्टकरी शेतकर्यांच्या विरोधात धोरण राबवीत आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढत असतांना लोकांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी भारतीय जनता पक्ष भावनीक मुद्दे उपस्थित करुन लोकांची दिशाभूल करीत आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या चळवळींना लोकांचे प्रश्न मांडण्याची मोठी जबाबदारी येवून पडली आहे. कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर भविष्यात मोठा संघर्ष निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी मावळते जिल्हासचिव कॉ. प्रदीप नागापूरकर यांनी अहवाल सादर केला तर या अहवालावर कॉ.के.के.जांबकर, कॉ.हसनाळीकर, कॉ.मोईज, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.गुरुपुठ्ठा यांची चर्चा केली. यावेळी कॉ.हुसेन, कॉ.चरनअंधे, कॉ.श्रीराम यादगिरी यांच्यासह जिल्हा कौन्सीलचे सदस्य व पक्ष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.